send link to app

Esilage


4.2 ( 7872 ratings )
Comida y bebidas Compras
Desarrollador Mukesh More
Libre

पशुधनाच्या आहारासाठी पारंपारिक पध्दतीने वैरण साठवून आवश्यकतेनुसार पुरविण्यांत येते. धान्य पीक काढल्यानंतर उर्वरीत पिकांचे अवशेष (क्रॅाप रेसीडयू) जसे, ज्वारीचा कडबा, बाजारीचे सरमाड, गव्हाचा भूसा, भाताचा पेंढा व इतर गवत इत्यादी वैरणीचा ढीग किंवा गंजी रचून, तसेच शेडमध्ये ठेवून साठविण्यांत येते व पुढील वैरण उपलब्ध होईपर्यन्तच्या कालावधीत उपयोगात आणली जाते. परंतू, हिरवी वैरण लवकर खराब होत असल्याने हिरवी वैरण साठवून उपयोगात आणण्यास अडचण निर्माण होते.

हिरव्या वैरणीत प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, स्फूरद व इतर प्रमुख पोषणमूल्य घटक असल्याने व पशुधनाच्या वाढीसाठी, दुग्ध उत्पादनासाठी तसेच प्रजोत्पादनासाठी आवश्यक पोषणमूल्य (न्यूट्रीटीव्ह) सकस आहाराची गरज असल्याने, आवश्यक पोषणमूल्य घटक हिरव्या वैरणीतून उपलबध होत असल्याने, पशुधन आहारात हिरवी वैरण महत्वाचा घटक आहे. पशुधनासाठी दैनंदिन आहारात व वर्षभर हिरवी वैरण उपलब्ध होण्यास मुलभूत सुविधा जसे - जमिन, सिंचन, बियाणे, खते, मजूरी इत्यादी वरील भांडवली खर्च किफायतशीर ठरत नाही. अशा वेळी खरीप हंगामात (पावसाळयात) उपलब्ध होणारी अतिरिक्त हिरवी वैरण हवाबंद (अनअेरोबीक) पध्दतीने साठवून हिरव्या वैरणीतील पोषण मूल्य घटकांचे जतन करुन वैरण दीर्घकाळ टिकविण्यासाठी, मुरघास तयार करणे हिरव्या वैरणीच्या उपलबधतेसाठी पर्याय ठरतो.